Solapur (प्रतिनिधी):- दादासाहेब जगताप, संविधान न्यूज चॅनल सह . संपादक श्री दत्त इंडिया प्रा,लि. हविनाळ–चडचण साखर कारखान्याच्या गट कार्यालयाचे कामती येथे भव्य आणि उत्साहवर्धक वातावरणात उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यास परिसरातील शेतकरी, वाहनचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.उद्घाटन प्रसंगी जनरल मॅनेजर अनिरुद्ध पाटील साहेब, मुख्य शेती अधिकारी बिराजदार साहेब, ऊस पुरवठा अधिकारी महेश वरूटे साहेब, तसेच फिल्डमन अण्णासाहेब सलगर हे मान्यवर उपस्थित होते. पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या वेळी जनरल मॅनेजर अनिरुद्ध पाटील साहेब यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की,
“श्री दत्त इंडिया प्रा, लि हविनाळ कारखाना नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहिला आहे. आगामी हंगामात कारखाना शेतकऱ्यांना स्पर्धात्मक व योग्य दर, तसेच वेळेवर ऊस बिल अदा करून पारदर्शक व्यवहार करेल. कारखान्याच्या कार्यपद्धतीत सातत्याने सुधारणा करून सर्व संबंधित घटकांना समाधान देण्याचे आमचे ध्येय आहे.”
त्याचबरोबर मुख्य शेती अधिकारी बिराजदार साहेब यांनी कारखान्याच्या नव्या गट कार्यालयामुळे शेतकऱ्यांपर्यंत कारखान्याची सेवा अधिक सुलभ होईल, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन फिल्डमन अण्णासाहेब सलगर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ऊस पुरवठा अधिकारी महेश वरोटे साहेब यांनी मानले.
कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, शेतकरी व ग्रामस्थ यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उद्घाटन सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.
