सोलापूर(ता. मोहोळ) प्रतिनिधी :- दादासाहेब जगताप संविधान न्यूज चॅनल सह.सपादक. मोहोळ तालुक्यातील मोजे अंकोली येथील,भैरवनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेज, अंकोली येथे व्याख्यान पूजन व वृक्षालागवड कार्यक्रम उत्साहात पार पडला त्यावेळी भारताचे माजी राष्ट्रपती व महान वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त भैरवनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, अंकोली येथे प्रेरणादायी व्याख्यान, पूजन व वृक्षलागवड कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन व पूजन प्राचार्य जे. जे. जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “डॉ. कलाम यांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील दीपस्तंभ ठरावेत. त्यांच्या कार्यातून विज्ञाननिष्ठा, प्रामाणिकता आणि देशभक्तीचे मोल शिकण्यासारखे आहे.”
कार्यक्रमाचे पर्यवेक्षण दादासाहेब पवार सर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना कलाम यांच्या शिस्त, मेहनत आणि स्वप्नपूर्तीच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले.या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारीवर्ग तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी “भारत 2020” व “स्वप्न बघा आणि ते पूर्ण करा” या विषयांवर भाषणे आणि निबंध सादर करून डॉ. कलाम यांच्या विचारांना अभिवादन केले.
यानंतर विद्यालय परिसरात वृक्षलागवड कार्यक्रम घेण्यात आला तसेच वृक्षवाटपाद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पाटील सर यांनी केले, तर आभारप्रदर्शन बसवराज पुजारी सर यांनी मानले.संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी, अनुशासित आणि आनंदी वातावरणात पार पडला.
