ठेकेदारांच्या बेजाबाबदारपणामुळे जनतेला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो , प्रभाकर भैय्या देशमुख

सोलापूर प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 17 10 2025 रोजी वार शुक्रवारी ठीक 11 30.वा मोहोळ तहसील कार्यालसमोर धरणे आंदोलन आहे मागण्या मोहोळ तालुक्यातील मौजे पाटकुल ते फुलचिंचोली तसेच पेनुर ते येवती रस्ता व मोहोळ शहरातील शिवाजी महाराज चौकातून ते गवत्या मारुती चौकापासून ते रेल्वे स्टेशन पर्यंत त्वरित डांबरीकरण करण्यात यावा हे रस्ते मंजूर असून संबंधित अधिकाऱ्यांच्या व ठेकेदारांच्या बेजाबाबदारपणामुळे जनतेला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या रस्त्यामुळे अनेकांचे हात पाय मोडले आहेत मोहोळ शहरातील व्यापाऱ्यांना तर हॉटेल असो कपड्याचे दुकान जनरल स्टोअर्स मेडिकल भाजीपाला इतर अनेक दुकानदारांना या धुळीचा त्रास सहन करावा लागतो भविष्यात आरोग्याला सुद्धा याचा धोका आहे याला जबाबदार अधिकारी आहेत

 

 

 

 

तरी त्वरित डांबरी करणाच्या कामाला सुरुवात करावी अन्यथा संबंधिता वरती गुन्हे दाखल करण्याची मागणी संघटनेच्या वतीने केली आहे आजच्या आंदोलनात तमाम मोहोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी तसेच तुमच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी व मोहोळ शहरातील व्यापारी यांनी सहभागी व्हावे अशी विनंती प्रभाकर भैया देशमुख यांनी केली आहे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *