मोहोळ मतदार संघाचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणार,मोहोळ मतदार संघाचे माजी आमदार यशवंत माने .

सोलापूर,प्रतिनिधी –दादासाहेब जगताप संविधान न्यूज चॅनल सहसंपादक.

 

मोहोळ मतदार संघाचे माजी आमदार यशवंत माने यांनी आज पंढरपूर तालुक्यातील मौजे तारापूर, मगरवाडी येथे दौरा करून दिवाळीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

 

या दौऱ्यादरम्यान, यशवंत माने यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी, अतिदृष्टीची समस्या, तसेच जनावरांच्या चाऱ्याची घरे पाण्यात गेलेली असल्याची परिस्थिती याबाबत विचारपूस केली. त्यांनी या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्याची हमी दिली.

 

यावेळी यशवंत माने यांनी संपूर्ण परिसरातील विकास आणि नागरिकांच्या जीवनमान सुधारण्यासाठी पुढील प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. स्थानिक रहिवाशांनी माने यांच्या भेटीचे स्वागत केले आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

 

तारापूर गावचे माजी सरपंच व सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखाना चे संचालक प्रदीप निर्मळ, प्रदीप कदम, सागर निर्मळ, माजी सरपंच वैभव काका डोळे, श्रीकांत डोळे, अजिंक्य सपाटे ,संतोष शेळके , शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासो बोबडे, प्रहार धरणग्रस्त जिल्हाध्यक्ष रंजीत जगताप, बंडू शिंदे, अण्णा चौरे, राम बंडगर, बिरू पाटील, अमोल शिंदे, शशिकांत शिंदे, तारापूर ग्रामपंचायत सदस्य सुनील चौधरी, अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *