राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा संघ जाहीर — सेवासदनच्या सात खेळाडूंची निवड…

 

 

सोलापूर प्रतिनिधी – दादासाहेब जगताप, संविधान न्यूज चॅनल सहसंपादक :

पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा असोसिएशनचा संघ आज जाहीर करण्यात आला. या निवड प्रक्रियेत सेवासदन संस्थेच्या सात खेळाडूंनी आपले स्थान निश्चित केले आहे.

 

निवड झालेल्या खेळाडूंमध्ये कुमारी गिरीजा भोसले, श्रावणी माने, ऋतुजा काळे, प्रतीक्षा गुंड, श्रावणी वाघमारे, वैष्णवी वाघमारे आणि तन्वी लोंढे यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंना क्रीडा प्रमुख ज्ञानेश्वर काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 

 

सदर निवड चाचणी राजीव गांधी स्टेडियम, सोलापूर येथे पार पडली. निवड समितीमध्ये श्री. सुदेश मालप, श्री. शरण वांगी सर, श्री. राहुल हजारे सर आणि श्री. पवन भोसले सर यांनी सहभाग घेतला आणि खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेतला.

 

या यशस्वी खेळाडूंना सेवासदन संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग यांनी हार्दिक अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *