संपादक: लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखाना लक्ष्मी नगर, अनगर, ता. मोहोळ चा सन 2025-26 गळीत हंगाम शुभारंभ (मोळीपूजन) आण्णासाहेब गणपतराव देशमुख B.Sc.Agri (प्रगतशील बागायतदार, पेनूर) यांचे हस्ते शुक्रवार २४ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी एम.आय. देशमुख यांनी दिली.

मोहोळ, पंढरपूर, परांडा , वैराग परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्यांचे पाठबळावर आणि माजी राजन मालक पाटील यांचे मार्गदर्शनातून चेअरमन बाळराजे पाटील यांचे नियोजनात कारखाना सुरू असुन यंदा पहिल्यांदाच मशिन चे माध्यमातून जास्तीत जास्त ऊस तोड करण्याचा निर्णय कारखाना प्रशासनाकडून घेतला आहे. शुक्रवार रोजी होणार्या मोळी पुजन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यशवंतजी माने (मा. आमदार, मोहोळ) हे असणार आहेत तर गव्हाण पूजन बाळासाहेब रंगनाथ वसेकर पाटकूल, ता. मोहोळ, जि. सोलापूर “व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मनिषाताई बाळासाहेब वसेकर यांचे हस्ते होणार आहे. मा.ना.श्री.राजनजी पाटील अध्यक्ष सहकार परिषद, महाराष्ट्र राज्य यांचेसह

विक्रांत (बाळराजे) राजन पाटील (चेअरमन), अजिक्यराणा राजन पाटील, प्रकाश चवरे, अशोक चव्हाण, शुक्राचार्य हावळे, मदनसिंह पाटील, संदीप पवार, संभाजी चव्हाण, ओमप्रकाश जोगदे (मुख्य कार्यकारी अधिकारी) व सर्व कर्मचारी वृंद यांची उपस्थित राहणार असुन यावे ऊस उत्पादक शेतकर्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
