(शनिवारी युवक नेते बाळराजे पाटील यांचे हस्ते प्रवेश कार्यक्रम)
पंढरपूर (प्रतिनिधी): मोहोळ तालुक्यातील नांदगाव येथील उपसरपंच शाहीर मस्के, मा.उपसरपंच सोमनाथ मस्के, मा.ग्रा.पं सदस्य नंदकुमार कांबळे, ग्रा.पं सदस्य रवी कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र राज्य सहकार परिषद अध्यक्ष तथा मा. आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली व लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या हस्ते लोकनेते परिवारामध्ये शनिवार २५ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर प्रवेश करणार आहेत.
तालुक्यातील यावेळी सज्जन पाटील, धनाजी गावडे, अक्षय खताळ, मुकुंदा आवताडे, राहुल मोरे, शुक्राचार्य हावळे, शशिकांत पाटील, कैलास मळगे, कालिदास गावडे, मोहन होनमाने, सखाराम साठे, मोहन चौगुले, गणेश कोळी, आबा चटके, बंडू चटके, लक्ष्मण गावडे, दादा नागणे, महेंद्र वाघमारे, वाल्म ीक कोळी, बबलू देवकते, धनाजी व्यवहारे, सिद्धू रोटे, हनुमंत भोसले, शशिकांत चव्हाण आदी प्रमुख उपस्थित राहणार आहे.
