सोलापूर प्रतिनिधी:-दादासाहेब जगताप,संविधान न्यूज चॅनल सहसंपादक.मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगरच्या १२व्या गळीत हंगामाचा शुभारंभ भैरवनाथ उद्योग समूहाचे चेअरमन मा.श्री अनिल (दादा) सावंत यांच्या हस्ते गळ्यात ऊस टाकून करण्यात आला. या कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित होते.
सुरवातीस सुरुवातीस सत्यानारायण पूजा श्री. गोपाल भोसले व त्यांच्या पत्नी सौ. आशिनी यांच्या शुभहस्ते करण्यात आली. कार्यक्रमाच्या वेळेस चेअरमन मा. अनिल (दादा) सावंत यांनी सांगितले की, कारखान्याचे संस्थापक मा. ना. प्रा. डॉ. तानाजी राव सावंत साहेब (माजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे.
यावेळी त्यांनी विश्वास व्यक्त केला की, आजपर्यंत गळीत हंगाम पूर्ण झालेल्या कारखान्याने भविष्यात देखील यशस्वी गळीत हंगाम चालवेल. यासाठी लागणारी सर्व ऊस तोडणी-वाहतूक यंत्रणा कार्यान्वित असल्याचे सांगण्यात आले. संस्थापक डॉ. तानाजी राव सावंत साहेबांनी या कारखान्याला ६ लाख मे.टन गाळप क्षमता दिल्याचे चेअरमन अनिल (दादा) सावंत यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमास चंद्रशेखर कोंडुभरी (शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), शरद पवार गट, रामचंद्र जाधव, शिव सेना शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख, श्री. पती (आप्पा) माने, भिमराव कांबळे, नामदेव ढो, अप्पासाहेब माने, चंद्रशेखर कोंडुभरी, माणिक गूंगे, दत्तात्रय खडते, जमीर इनामदार, रामचंद्र जाधव, दादा पवार, आदित्य सावंत, अनुज सावंत, समीर जाधव, अरुण गायकवाड, जनरल मॅनेजर बाळासाहेब शिंदे, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकेले, मुख्य शेतकी अधिकारी शिवाजी चव्हाण, शेतकी अधिकारी कृष्णदेव लोंढे, चीफ अकाउंटंट देवानंद पासले, एच आर मॅनेजर संजय राठोड, ई.डी.पी मॅनेजर गजानन माने-देशमुख, केन्याई सुपरवायझर शंकर पाटील, इलेक्ट्रिक इंजिनिअर संतोष माळी, स्टोअर किपर केदार सावणे, सुरक्षा अधिकारी प्रकाश कमळे, कार्यालय अधीक्षक अभिजीत पवार यांच्यासह परिसरातील संपंच, मान्यवर, पत्रकार बंधू व ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी-वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.
