माढा ,प्रतिनिधी :- शरद धर्मा भांगे, माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) सामाजिक न्याय विभागाच्या तालुका अध्यक्षपदी श्री. सचिन साबळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल माढा शहर तसेच संपूर्ण तालुक्यातून नागरिकांकडून हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वंचित, शेतकरी, कामगार तसेच सर्वसामान्य घटकांसाठी सातत्याने कार्य करण्याचा संकल्प श्री. साबळे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला असून, पक्ष संघटन अधिक बळकट होण्यास हातभार लागेल, अशी प्रतिक्रिया पक्षातील कार्यकर्त्यांनी दिली आहे.
या निमित्ताने सचिन साबळे यांचा सत्कार करून त्यांना पुढील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
