इंदापूर प्रतिनिधी, विठ्ठल काळे:भिगवण नजीक गरोदर महिलेचा मृतदेह पुलाखाली; चादरीत गुंडाळलेला इंदापूर तालुक्यात खळबळ*रविराज” नावाचा टॅटू असलेला महिलेचा संशयास्पद मृत्यू _ भिगवाण पोलिसाकडून सखोल तपास सुरूइंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावच्या हद्दीत पुलाखालील पाण्यात एका महिलेचा कुजलेला मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहामुळे खुनाचा गंभीर संशय व्यक्त होत असून भिगवण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत*.
*मिळालेल्या माहितीनुसार बारामती_ भिगवण राज्य मार्गावरील मदनवाडी पुलाखाली हा मृतदेह स्थानिक नागरिकांना दिसून आला. घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक पाहणीअंति पोलिसांनी सांगितले की, मृत महिला अंदाजे 25 ते 30 वर्षाची असून ती सहा ते सात महिन्याची गरोदर होती. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्याला सुमारे पाच ते सहा दिवस झालेले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महिलेच्या डाव्या हातावर “रविराज” असे टॅटू आढळून आले असून त्यावर तिचा ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे*.
*प्राथमिक तपासानुसार महिलेचा खून करून मृतदेह पुलाखाली टाकण्यात आला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. परिसरात मोठी गर्दी जमल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती*. *भिगवण पोलिसांनी सांगितले की या प्रकरणाचा तपास बहुविध अंगाने सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, हरवलेल्या महिलांच्या नोंदी, तसेच मोबाईल लोकेशन डेटा तपासले जात आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार या महिलेची ओळख पटणे हेच सध्या तपासातील सर्वात मोठे आव्हान ठरले आहे*.
*ओळख पटल्यानंतर या गरोदर महिलेच्या हत्येमागील कारण आणि आरोपीची ओळख समोर येईल, असा विश्वास पोलीस तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे मदनवाडी परिसरात भीतीच आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे*.
