मोहोळ तालुका,मंत्री राजन पाटील यांच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचा कटाक्ष.

 

राम गायकवाड संपादक,सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दोन माजी आमदारांनी अलीकडेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक शक्तीला मोठा तडा बसला आहे. या घडामोडींमुळे भाजपचे पारडे आगामी निवडणुकीत आणखी जड होईल का? हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

मंत्री पद भूषवणारे आमदार राजन पाटील यांच्या राजकीय भूमिकेबाबतही चर्चांना उधाण आले आहे.  त्यांच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर त्यांनीही आपली दिशा बदलली, तर भाजपची ताकद सोलापूर जिल्ह्यात अधिक भक्कम होणार यात शंका नाही.

 

 

राष्ट्रवादीतील ध्रुवीकरण, भाजपचा सक्रीय पक्षप्रवेश कार्यक्रम आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरणे यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चित्र पूर्णपणे वेगळे असेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. पक्षांतराच्या या मालिकेमुळे आगामी काही दिवसांत आणखी मोठ्या हालचाली संभवत असून राज्याचे लक्ष सोलापूर जिल्ह्याकडे केंद्रित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *