किशोर निर्मळ इंग्लिश मीडियम तारापूर, या बाजारामध्ये 72,340 हजारांची उलाढाल झाली.

किशोर निर्मळ इंग्लिश मीडियम व श्री दर्लिंग विद्या मंदिर तारापूर बाजार डे व सायन्स एक्जीबिशन उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा

संविधान न्यूज चैनल मुख्य संपादक राम गायकवाड

 

 

श्री दर्लिंग विद्या मंदिर व किशोर निर्मळ इंग्लिश मीडियम स्कूल तारापूर येथे बाजार डे व सायन्स एक्जीबिशन मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडले

 

 

 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मा. श्री. मारुती लिगाडे साहेब (शिक्षण विस्तारअधिकारी पंढरपूर) मा. श्री .सुभाष अधटराव साहेब (सहाय्यक केंद्र प्रमुख केंद्र तुंगत) मा .श्री .सागर नारायण निर्मळ सर (संस्थापक अध्यक्ष) मा. श्री .प्रदीप कदम (संस्थापक उपाध्यक्ष )इतर सर्व मान्यवर, पालक, माता पालक या सर्वांच्या हस्ते रिबीन कट करून!व प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 

 

 

आजच्या कार्यक्रमांमध्ये खास आकर्षण ठरले ते म्हणजे नर्सरी ते सिनियर केजी मधील विद्यार्थ्यांनी सादर केलेले ट्रॅफिक रुल, रेल्वे लाईन, कम्युनिटी हेल्पर्स तसेच भारताचा नकाशा त्यामध्ये बारा ज्योतिर्लिंग दर्शन ,सहल रूट, भूभागांचे प्रकार हे दाखविण्यात आले .सायन्स एक्जीबिशन मध्ये पहिली ते सातवी विद्यार्थ्यांनी सोलार लाईट हाऊस, पवनचक्की लाईट, कार्बन प्युरी फिकेशन वर्किंग मॉडेल, मॅग्नेट कार ,फोटोसिंथेसिस, ह्युमन राइट्स, हायड्रोक्लोरिक लिफ्ट, मशीन,, प्रोटेक्शन सिस्टीम अशा प्रकारे विविध प्रयोग विद्यार्थ्यांनी दाखविले.

 

 

बाजारामध्ये पालेभाज्या, फळे, खाऊ गल्ली मध्ये चायनीज ,पाणीपुरी, भेळ, कचोरी ,दही धपाटे, पॅटीस, शीरखुर्मा, स्टेशनरी साहित्य, किराणामाल ,धान्य, बेकरी ,मासळी बाजार ,बारा बलुतेदार, संक्रांत वान ,विविध प्रकारच्या बी बियाणे, फनी गेम्स, घर संसार वासुदेव, पिंगळा इत्यादी सर्व बाल चिमुकल्यांनी सादर केले होते. या बाजारामध्ये 72,340 हजारांची उलाढाल झाली.

 

 

हा बाजार डे पालक ,माता पालक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला. शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!