सारोळे शाळेत राजमाता जिजाऊ जयंती, चार हुतात्मे व स्वामी विवेकानंदांना भावपूर्ण अभिवादन…

सारोळे शाळेत राजमाता जिजाऊ जयंती, चार हुतात्मे व स्वामी विवेकानंदांना भावपूर्ण अभिवादन…

सोलापूर प्रतिनिधी:- दादासाहेब जगताप,संविधान न्यूज चॅनल सहसंपादक.

 

 

मोहोळ तालुक्यातील सारोळे येथील प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ जयंती, सोलापूरचे चार हुतात्मे यांची पुण्यतिथी तसेच स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात थोर व्यक्तिमत्त्वांना अभिवादन करण्यात आले.

 

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजमाता जिजाऊंची सुंदर वेशभूषा साकारलेली सहावीतील विद्यार्थिनी सिया कथले होती. प्रारंभी राजमाता जिजाऊ, चार हुतात्मे व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.

 

 

 

यावेळी मुख्याध्यापक दत्तात्रय माने, शिक्षिका सारिका देशमुख, दत्तात्रय नागणे, भागिरथी डोके, अरुंधती सलगर, रमेश दास तसेच विद्यार्थिनी ईश्वरी शेळके, स्वरा भोसले व सिया कथले यांनी मनोगत व्यक्त केले.

 

 

राजमाता जिजाऊ यांनी शिवबाला घडवून हिंदवी स्वराज्याची पायाभरणी केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दूरदृष्टी असलेले नेतृत्व देशाला दिले, असे विचार विद्यार्थ्यांनी मांडले.

 

 

मुख्याध्यापक दत्तात्रय माने यांनी चार हुतात्म्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला, तर शिक्षिका सारिका देशमुख यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले.

 

कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, संस्कार आणि प्रेरणा निर्माण झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!