कै. भारत दगडू सरवळे यांचे द्वितीय पुण्यस्मरण 19 फेब्रुवारी रोजी ॥
सोलापूर (ता. मोहोळ) :- श्री दादासाहेब जगताप संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक.
मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील जेष्ठ व आदरणीय व्यक्तिमत्त्व कै. भारत दगडू सरवळे यांचे द्वितीय पुण्यस्मरण श्रद्धा व भक्तिभावाने संपन्न होणार असून, सदर कार्यक्रम दिनांक 19/02/2026 रोजी होणार आहे.
कै. भारत सरवळे यांचे मृत्यू दिनांक 12/03/2024 रोजी झाला होता. त्यांच्या पश्चात त्यांच्या आठवणी जपत कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, हितचिंतक व अंकोली ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कै. भारत सरवळे हे अंकोली परिसरात एक सुसंस्कृत, मार्गदर्शक व सर्वांना आपुलकीने जोडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या सामाजिक व कौटुंबिक जीवनातील योगदानाची आठवण म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या पुण्यस्मरण कार्यक्रमास नातेवाईक, मित्रपरिवार, हितचिंतक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन समस्त सरवळे परिवार व अंकोली ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
