पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावात महिलांनी महिलांसाठी सुरू केलेली पंढरपूर तालुक्यातील पहिली पतसंस्था ही आदर्शवत संकल्पना असुन १९९६ साली याच ठिकाणी मी आयोजित आयोजित केलेल्या महिला कार्यक्रमास फक्त चार महिलांची उपस्थिती होती आज याच गावात शेकडोंच्या संख्येत महिला उपस्थित राहतात हे भूषणावह असल्याचे प्रतिपादन डाॅ.सौ.मृदुला तळेकर यांनी केले.
भोसे याठिकाणी तुकाराम मस्के सरांचे संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या ज्ञान-ईश्वरी महिला पतसंस्थेचे उद्घाटन डाॅ.सौ. मृदुला तळेकर यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांचे हस्ते पतसंस्थेचे उद्घाटन करण्यात आले. पुढे बोलताना डाॅ.तळेकर म्हणाल्या, महिलांना आर्थिक व्यवहारात सक्षम बनविण्यासाठी पतसंस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. भोसे या गाव परिसरातील महिलांना ज्ञान ईश्वरी पतसंस्थेच्या माध्यमातून स्वयंरोजगार व बचत संस्कृती बळकट करण्यास मदत होणाच परंतु महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी भविष्यात अशा पतसंस्थांची गरज असून पतसंस्थेच्या शाखा गाव गाड्यात उभारल्यास महिलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर व सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले होतील, असे प्रतिपादन त्यांनी केले. भोसे गावात या पतसंस्थेमुळे महिलांना बचत ठेवण्याचे हक्काचे ठिकाण मिळाले आहे. या पतसंस्थेमार्फत महिलांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होणार असून महिलांनी स्वयंरोजगारासाठी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ अभिजीत पाटील यांनी उपस्थितीत महिलांना केले.
या उद्घाटन सोहळ्यासाठी सौ. प्रेमलता रोंगे व्हा. चेअरमन, श्री विठ्ठल कारखाना, सौ. राजश्रीताई ताड जिल्हा समन्वयक, राष्ट्रवादी महिला, श.प., सौ. कलावतीताई खटके संचालिका, श्री विठ्ठल कारखाना, सौ. सविता रणदिवे संचालिका, श्री विठ्ठल कारखाना, सौ. डॉ. अमृता रणदिवे सरपंच, तुंगत सौ. स्मिता पाटील मा.सरपंच, कान्हापुरी, सौ. अनिता पवार जिजाऊ ब्रिगेड, महिला तालुकाध्यक्ष,डॉ. सौ. मृदुला तळेकर रखुमाई फाऊंडेशन, सौ. विनंतीताई कुलकर्णी जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवती काँग्रेस श.प., सौ. सुनिता कोरके पोलीस पाटील, भोसे, चारुशिला कुलकर्णी प्रदेश संघटक, राष्ट्रवादी यु.काँग्रेस श.प., सौ. कोमल शेजाळ-गवळी कृषी अधिकारी, ठाणे, कु. प्रतिक्षा माळी सुवर्णपदकप्राप्त, भारत सरकार, कु. पुजा थिटे तंज्ञ अधिकारी, कृषि अधिक्षक कार्यालय, परभणी, सौ. प्रमिला सोमनाथ झांबरे व्हा. चेअरमन, सरपंच, देवडे, सौ. वैशाली तुकाराम मस्के चेअरमन, सौ. रिगल सिध्देश्वर कोरके संचालक (भोसे), सौ. तनुजा विठ्ठल पाटील संचालक (ओझेवाडी), सौ. शितल सज्जन पवार संचालक (मगरवाडी), सौ. शर्मिला परमेश्वर आसबे, सौ. अरुणा सुनिल चव्हाण, सौ.अश्विनी दत्तात्रय लोकरे संचालक (शेळवे), सौ. आशा भास्कर शिंदे संचालक (चिलाईवाडी), सौ. सखुबाई पोपट खरात, संचालक (भोसे), सौ. वैशाली राहुल नाईकनवरे संचालक (खरातवाडी), सौ. वनिता तुकाराम कोरके सचिव (भोसे), श्री. प्रशांत अर्जुन कोरके प्रतिनिधी (भोसे) आदी प्रमुख उपस्थित होते.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा नवा टप्पा : डाॅ.सौ.तळेकर
ज्ञान ईश्वरी पतसंस्था ही भोसे गावातील पहिली महिलांची पतसंस्था असून, या भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा नवा टप्पा हि पतसंस्था ठरेल. या संस्थेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना स्वावलंबी बनवणे आणि लोकसंख्येतील सुमारे ४० टक्के हिस्सा असलेल्या महिलांना उद्योग, व्यवसाय व आर्थिक व्यवहारात प्रोत्साहन मिळणार आहे.
डाॅ.सौ.मृदुला तळेकर
संस्थापक अध्यक्षा, रखुमाई फाउंडेशन भोसे
