पंढरपूर तालुक्यातील,तारापूरच्या मुकेश देडगे यांचा क्लास वन ऑफिसर म्हणून यशस्वी प्रवास!….

संपादक,राम गायकवाड संविधान न्यूज चॅनल,

पंढरपूर तालुक्यातील तारापूर या छोट्याशा गावातील मुकेश अनिल देडगे या तरुणाने आपली जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर क्लास वन ऑफिसर पदाची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. गरीब कुटुंबातून आलेल्या या युवकाने आपल्या कुटुंबाचे, गावाचे तसेच पंढरपूर तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

 

मुकेशने आपल्या शिक्षणाच्या काळात अनेक अडचणींवर मात करत कठोर परिश्रम घेतले. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्याने आपल्या ध्येयावर विश्वास ठेवत प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आज त्याच्या या यशामुळे तारापूर गावात व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

या परीक्षेद्वारे निवड होणारी क्लास वन अधिकारी पदे ही शासनातील उच्च दर्जाची अधिकारी पदे असून त्यामध्ये खालील पदांचा समावेश आहे ,

उपजिल्हाधिकारी

 

पोलीस उपअधीक्षक (डी.वाय.एस.पी.)

 

सहाय्यक आयुक्त विक्रीकर

 

उपनिबंधक, सहकारी संस्था

 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी

 

अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

ब्लॉक विकास अधिकारी (बीडीओ) – एक

वित्त, लेखापरीक्षण आणि लेखा सेवा – गट अ

मुख्याधिकारी, नगर पालिका / नगर परिषद – अ

तहसीलदार

या यशामुळे मुकेश देडगे यांच्याबरोबर त्यांचे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ अभिमानाने भरून गेले आहेत. मुकेश आता तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत असून, “जिद्द आणि परिश्रमाने काहीही अशक्य नाही” हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे.

 

 

 

📸 तारापूरसह पंढरपूर तालुक्यातून मुकेशच्या यशाबद्दल शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *