सोलापूर,प्रतिनिधी -दादासाहेब जगताप संविधान न्यूज चॅनल सहसंपादक.
कार्तिक महिन्याच्या पवित्र निमित्ताने अंकोली गावातून भैरवनाथ प्रसादिक पायी दिंडी सोहळा आणि कार्तिकी वारी मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात रवाना झाली. पहिल्याच वर्षी या दिंडीला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, संपूर्ण गावात हरिनामाच्या गजराने वातावरण दुमदुमून गेले.
या सोहळ्याचे प्रमुख कीर्तनकार ह.भ.प. प्रज्ञाताई पुजारी (अंकोली) यांनी सुंदर कीर्तनातून हरिनामाचे महत्त्व सांगत भक्तांना अध्यात्मिक प्रेरणा दिली. त्यांच्यासह बाल कीर्तनकार ह.भ.प. प्रज्ञाताई पुजारी, तसेच बटू (नाना )पवार, बबन भालेराव, राजू भंडारे, रवींद्र पवार यांनीही सहभाग घेत वारीचा उत्साह वाढवला.
भक्तीगीत, अभंग, आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात महिला मंडळातील सुनंदा पुजारी, सूरेखा भगरे, सूनंदा पवार, राजाबाई भालेराव, नंदा भोसले आणि वैशाली भालेराव यांनी सुमधुर भजने सादर करून वातावरण भारावून टाकले.
प्रशांत पुजारी यांनी पखवाज वादन, तर चालक भास्कर (आऊ)डोके यांनी संपूर्ण दिंडीचे नियोजन उत्कृष्टरीत्या केले.
या सोहळ्याचे उद्घाटन सुधाकर सरवळे यांच्या हस्ते करण्यात आले. भक्तांसाठी चंद्रकांत{बूवा} माळी, धनाजी सूरवसे आणि गणेश गुंड यांनी चहा-पाण्याची सोय करून मोलाची सेवा दिली.
प्रभाकर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली बालभक्त मंडळींनी हरिनामाच्या गजरात गांवभर दिंडी फिरवून भक्तीचा झंकार निर्माण केला.
दिंडीच्या शेवटी प्रसाद वितरणाने सोहळ्याची सांगता भक्तिमय वातावरणात करण्यात आली.
