ऊसदर व थकीत बिलांबाबत जनहित शेतकरी संघटनेचे, रस्ता रोको आंदोलनआंदोलन

संपादक.राम गायकवाड संविधान न्यूज चॅनल.

सोलापूर, दि. 31 ऑक्टोबर 2025

महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर (भैय्या) देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ऊसदर निश्चिती, थकीत बिले, तसेच साखर कारखान्यांच्या अनियंत्रित आर्थिक व्यवहारांविरोधात तीव्र भूमिका घेत सोलापूर जिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यासोबतच देशमुख यांनी साखर सहसंचालक आणि साखर आयुक्त यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या कारभाराबाबत गंभीर तक्रारी मांडल्या आहेत.

 

⚙️ मुख्य मागण्या आणि तक्रारी

 

भैय्या देशमुख यांनी अधिकाऱ्यांकडे मांडलेल्या मागण्यांनुसार —

1️⃣ चालू गळीत हंगामासाठी ऊसाला रु. 3,500 प्रति टन दर जाहीर करावा.

2️⃣ पहिली उचल रु. 3,000 प्रति टन अशी अदा करावी.

3️⃣ थकीत बिले तातडीने भरून देऊन, उशीरा भरल्यास 15% व्याजासह भरणा अनिवार्य करावा.

4️⃣ कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून व्याज किंवा इतर प्रकारे होत असलेल्या अन्यायकारक वसुलीच्या पद्धती बंद कराव्यात.

 

🧾 थकीत बिले आणि व्याजविवाद

 

जय हिंद, सिद्धनाथ, शिरोमणी आणि गोकुळ या कारखान्यांकडून शेतकऱ्यांची बिले प्रलंबित आहेत. काही कारखान्यांनी बिलांवर 15% व्याजदर लागू करून अन्यायकारक व्यवहार केल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्यांनी शासनाला विनंती केली की, अशा कारखान्यांवर काटेकोर चौकशी करून, तोपर्यंत त्यांना गळीत परवाना देऊ नये.

 

विशेषतः गोकुळ साखर कारखाना व वीरवडे बु. व बीबीदारफळ मल्लेवाडी येथील शेतकऱ्यांची थकीत बिले त्वरित भरण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

🏛️ सरकारकडे सादर केलेले निवेदन

 

ही मागणी व निवेदन पुढील प्रमुख नेत्यांना सादर करण्यात आले आहे —

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, साखर मंत्री बाबासाहेब पाटील, साखर आयुक्त, साखर सहसंचालक आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांना हे निवेदन देण्यात आले असून, तत्काळ तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

🚜 शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाला इशारा

 

भैय्या देशमुख म्हणाले की, “दरवर्षी शेतकऱ्यांना 800 ते 900 रुपये प्रति टन कमी दराने अन्याय होत आहे. ऊसदर जाहीर न करता शेतकऱ्यांनी ऊस गाळपाला देऊ नये.”

शासनाने काटेकोर ‘काटे-चेक’ मोहिम राबवून कारखान्यांवर अचानक तपासणी करावी, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळता येईल, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

 

📣 १ नोव्हेंबर रोजी भव्य रस्ता रोको आंदोलन कुरूल येथे,

 

मागण्या तातडीने मान्य न झाल्यास, शनिवार, 1 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता, मौजे कुरुल येथील नॅशनल हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.

या आंदोलनात सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे प्रवक्ते रामभाऊ काटे पाटील, जिल्हा अध्यक्ष नाना मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र भाऊ मुठाळ, मोहोन भाऊ जमदाडे, औदुंबर बापू गायकवाड, कुरुलचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब पाटील आणि युवा नेते समर्थ प्रमोद लांडे यांनी केले आहे.

 

🌾 मोहोळ तालुका व जिल्ह्यातील सहभागी नेते

 

या निवेदनामध्ये नाना मोरे (युवा जिल्हाध्यक्ष), सुरेश बापू नवले (जिल्हा संघटक), भाऊसाहेब पाटील (उपाध्यक्ष), मोहन जमदाडे (कार्याध्यक्ष), औदुंबर बापू गायकवाड, पिनू देशमुख, नाना रणदिवे, निसार पाटील, विनायक सरवदे, जयप्रकाश मोरे, शिवशाल हावळे, दत्ता व्यवहारे (अंकोली), रणजितसिंह (भैय्या) पवार, बिरु वाघमोडे, सिदराम वाघमोडे, विजय तळेकर (देवडी), हरिभाऊ लोंढे (खंडाळी) आदी अनेक शेतकरी व नेते सहभागी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *