भुईंज पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई.

 

 

प्रतिनिधी बालाजी शिंदे:सातारा जिल्हयाती बस स्टॅन्डडवर सोने चोरी करणाऱ्या इनोव्हा गैंग टोळीस अटक करुन त्यांनी चोरी केलेले दागिने, गुन्हयात वापरलेले वाहन, मोवाईल असा एकुण १८ लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.)

 

दिनांक २०/०९/२०२५ रोजी सकाळी १०.१५ वा. ते दुपारी १२.०० वा.चे दरम्यान यातील फिर्यादी व साक्षीदार हे पुणे ते महाबळेश्वर वा बसने शिरवळ बस स्टॅन्ड येथुन केंजळ, ता. वाई असा प्रवास केले नंतर मौजे केंजळ, ता. वाई येथे आल्या नंतर फिर्यादी यांना त्यांचे उजव्या हातातील सोन्याची बांगडी नसल्याचे लक्षात आले म्हणून वगैरे मजकुरची छक्रार सौ. अंजलीदेवी अजित मोहिते रा. शिर्के कॉलनी-शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा यांनी दिलेने भुईंज पोलीस ठाणे गु.र.नं.२६६/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०३ (२), अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

 

वरील गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. तुषार दोशी भा.पो.से., पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, श्री. सुनिल साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई व श्री अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपींचा वात्काळ शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याच्या स्थानिक गुन्हे शाखा, सातारा तसेच पुथ्वीराज ताटे प्रभारी अधिकारी भुईंज पोलीस ठाणे यांना सुचना दिल्या होत्या, त्याअनुषंगाने पृथ्वीराज ताटे, सहायक पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी भुईंज पोलीस ठाणे यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टिमला मार्गदर्शन केले त्याअनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टिमने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहाणी करुन तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपींनी गुन्हयात वापरलेले वाहन निष्पन्न केले होते.

 

दि.१३/११/२०२५ रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखची टिम पोलीस ठाणे हद्दीत हायवे पेट्रोलींग करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक सिल्हर रंगाची इनोव्हा कार क्र. एम.एच.०४.डी.जे.०५४५ हि, मौजे बदेवाडी, ता. वाई गावचे हद्दीतील हॉटेल स्वरा गार्डनचे समोर सातारा ते पुणे जाणाऱ्या हावयेरोडचे लगत असणाऱ्या सव्हिसरोडवर संशयीतरीत्या उभी आहे. अशी माहिती मिळाल्याने गुन्हयात निष्पन्न केलेले वाहनाचा क्रमांक व संशयीतरित्या उभ्या असलेल्या वाहनाचा क्रमांक एकच असल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टिमने तात्काळ त्याठिकाणी जावून संशयीत वाहन व त्यातील इसमांना ताब्यात घेतले. संशयीतांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी शिरवळ, खंडाळा, सातारा, वाई येथील बस स्टॅन्डवर चोरी केल्याचे सांगितले.

 

सदर आरोपींचे कडुन भुईंज पोलीस ठाणे गु.र.नं. २६६/२०२५ या गुन्हयाचे तपासादरम्याण सातारा शहर पोलीस ठाणे गु.र.नं.-७८८/२०२५, वाई पोलीस ठाणे गु.र.नं. २८९/२०२५, खंडाळा पोलीस ठाणे गु.र.नं १४२/२०२५ मधील चोरीस गेलेले ६ लाख ६० हजार रुपये रक्कमेचे सोन्याचे दागिणे, तसेच गुन्हयात वापरलेले वाहन, मोचाईल असा एकूण १८ लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे.वातील आरोपीचे वर सातारा जिल्हयासह महाराष्ट्रातील कल्याण रेल्वे पोलीस ठाणे-जि.ठाणे, विठ्ठलवाडी पोलीस ठाणे-जि.ठाणे, माहिम पोलीस ठाणे-मुंबई, कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे-मुंबई, अंबड पोलीस ठाणे-नाशिक अशा पोलीस ठाण्यात एकूण १० जबरी चोरी, चोरी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

श्री. तुषार दोशी, भा.पो.से., पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. सुनिल साळुंखे, उप-विभागीय पोलीस अधिकारी वाई व पोलीस निरीक्षक व श्री. अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीराज ताटे सहायक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी भुईंज पोलीस ठाणे, पो.उ.नि. पतंग पाटील भुईंज पोलीस ठाणे, पो.उ.नि. शिंगाडे स्थानिक गुन्हे शाखा सातारा, तसेच भुईंज पोलीस ठाणेचे, पोहवा नितीन जाधव, पोकों, सोमनाथ बल्लाळ, पोकों. सागर मोहिते, पोकों किरण निंबाळकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार पोहवा अमोल माने, पोहवा राकेश खांडके, पोकों, स्वप्नील दौंड, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर यांनी सहभाग घेतला आहे.

 

बस स्टॅन्डवर बसमधील प्रवाशांचे गर्दीचा फायदा घेवून महिलांचे हातातील चांगड्या तसेच इतर सोने चोरी करणारी महाराष्ट्रातील सराईत गुन्हेगारांची टोळी पकडुन गुन्हयातील ६ महत्वाच्या आरोपींना अटक करुन सातारा जिल्हयातील गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्हयात वापरलेले बाहन हस्तगत करुन कौशल्यपूर्ण तपास केल्याबददल कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. तुषार दोशी भा.पो.से. पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. सुनिल साळुंखे, उप-विभागीय पोलीस अधिकारी, वाई यांनी अभिनंदन केले आहे.

अटक आरोपींची नावे-

 

१) सुरज सुरेश तिडंगे वय ३३ वर्षे, रा. वांद्रापाडा, सुभाषवाडी, अंचनाथ वेस्ट

 

२) हरीष शिवाजी जाधव वय ३४ वर्षे, रा. वांद्रापाडा, सुभाषवाडी, अंचनाथ वेस्ट

 

३) अमित चंदन गागडे वय ३७ वर्षे, रा. कैलासनगर, फडके रोड अंचरनाथ वेस्ट

 

४) अभिषेक चंदन गागडे वय २४ वर्षे, रा. फातिमा चर्च चे पाठीमागे, अंबरनाथ वेस्ट

 

५) सुमित कैलास गागडे वय २५ वर्षे, रा. पंचशीलनगर हैसिंग सोसायटी, सुभाष टेकडी, लल्हासनगर

 

६) पौर्णिमा सुरेश तिडंगे वय ३२ वर्षे, रा.वांद्रापाडा, सुभाषवाडी, अंबनाथ वेस्ट

 

वरील प्रमाणे एकुण ०६ आरोपी अटक करण्यात आले असुन ईतर ०२ आरोपी फरार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!