ढोकबाभुळगाव येथे भव्य कुस्ती स्पर्धा संपन्न — पैलवान विक्रम गायकवाड यल्लमादेवी चषकाचे मानकरी.
सोलापूर,प्रतिनिधी : – दादासाहेब जगताप, संविधान न्यूज चॅनल सहसंपादक
मोहोळ तालुक्यातील मौजे ढोकबाभुळगाव येथील ग्रामदैवत श्री यलम्मादेवी यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक कुस्ती स्पर्धेत पैलवान विक्रम गायकवाड यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण खेळ करत यल्लमादेवी चषक, चांदीची गदा आणि एक लाख रुपयांचे इनाम पटकावले.
🔸 उत्साहात पार पडले भव्य कुस्ती मैदान
ढोकबाभुळगाव येथील जागृत देवस्थान श्री यल्लमादेवी यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य परंपरागत कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कुस्ती शौकिनांची प्रचंड गर्दी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली. परिसरातील पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी उपस्थित होते.
🔸 मुख्य मानकरी : पैलवान विक्रम गायकवाड
१ लाख रुपये इनामाची मुख्य लढत
इनाम प्रदान : हॉटेल साई सिद्धेश्वरचे मालक श्री दयानंद गायकवाड
लढत : विक्रम गायकवाड विरुद्ध धनराज गाडे
या रोमांचक लढतीत पैलवान विक्रम गायकवाड यांनी बाजी मारत विजेतेपद पटकावले.
कै. बाबुराव अण्णा पाटील व अण्णा विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ हिंदकेसरी पैलवान समाधान पाटील यांच्या हस्ते विक्रम गायकवाड यांना चांदीची गदा प्रदान करण्यात आली.
🔸 विशेष मान्यवरांची उपस्थिती
कुस्ती मैदानात प्रमुख पाहुणे म्हणून
अजिंक्यराणा पाटील, सिनेट सदस्य — अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
यांची विशेष उपस्थिती लाभली.
तसेच युवा नेतृत्व/उद्योजक आणि मान्यवर म्हणून –
नानासाहेब गायकवाड, संभाजी चव्हाण, दयानंद गायकवाड, बाळासाहेब मुळे, किशोर खराडे, मधुकर पाटील, बबन लोमटे, संतोष तांबीले, मंगेश चव्हाण, दत्त काकडे, आकाश तांबीले, सागर नागणे, अमोल शिंदे
यांची उपस्थिती होती.
पंच कमिटीच्या वतीने अजिंक्यराणा पाटील यांचा शाल, श्रीफळ व फेटा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
🔸 आयोजन समितीचा विशेष सहभाग

हे भव्य आणि निकाली कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी
भीमराव मुळे, साहेबराव काकडे, रमेश गायकवाड, बाळासाहेब मुळे, शिवाजी पासले, राजाराम काकडे, नानासाहेब गायकवाड, हनुमंत पासले, बंडू मुळे, महादेव मस्के, भाऊ माळी,
तसेच पैलवान वस्ताद, ग्रामस्थ आणि पंचकमिटीचे विशेष परिश्रम लाभले
