इंदापूर तालुक्यातील सपकळ वाडी गावाचा अनोखा उपक्रम

 

 

इंदापूर प्रतिनिधी:

महाराष्ट्रातील बीड, लातूर, सोलापूर, धाराशिव तिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी गावातील नागरिकांनी मदतीचे आव्हान केले आणि सर्व गावातील नागरिक एकजुटीने सामील होऊन महिला बचत गट तसेच महिला ग्राम संघ यांनी पोहे रवा, आटा, गोडेतेल, मीठ, फरसाण, साखर, चहा पावडर कोलगेट, बिस्किट, साबण, तिखट किट इत्यादी वस्तू वाटप केले.

 

अंगणवाडी मुलांना पाटी पेन्सिल, बॅग, खाऊ गरोदर महिलांना वजन काटा अशी मदत गावाने दोन दिवसात केली.

इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी हे गाव सामाजिक बांधिलकी जपण्यात नेहमीच अग्रेसर असते. सामाजिक बांधिलकी या गावाने इंदापूर तालुक्यात एक वेगळाच ठसा उमटवलेला आहे, सार्वजनिक कामाला आपली मतभेद बाजूला ठेवून सर्वच एकत्र येऊन काम मार्गी लावतात .

नागरिकांनी त्या ठिकाणी जाऊन पूरग्रस्तांना मदत केली पुराची परिस्थिती पाहून मन हेलावून टाकणारी होती. त्यांना मदतीचा हात मिळावा या उद्देशाने सपकळवाडी गावातील नागरिकांनी पूरग्रस्तांसाठी कामी आलो, त्यामुळे मनाला समाधान वाटले असे मत गावातील नागरिकांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *