सोलापूर प्रतिनिधी, दि. ६ – देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कोर्टरूममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा सोलापुरात तीव्र निषेध करण्यात आला. संभाजी ब्रिगेडच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सरन्यायाधीश गवई यांच्या प्रतिमेस फुलांचा वर्षाव व दुग्धाभिषेक करून संविधान आणि न्यायव्यवस्थेप्रती निष्ठा व्यक्त करण्यात आली.

संभाजी ब्रिगेडने म्हटले की, “देशाचे सरन्यायाधीश यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ व्यक्तीवर नाही, तर भारतीय लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर म्हणजेच न्यायव्यवस्थेवर झालेला हल्ला आहे.”
संविधान हेच सर्वोच्च असून, कोणत्याही जाती-धर्मापेक्षा त्याचे स्थान वरचढ आहे. त्यामुळे हल्लेखोर वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली.
