शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात आमरण उपोषण

 

पंढरपूर (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले या अतिवृष्टीमुळे अनेक शेती खरडून गेल्याने शेतपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीत बाधित शेतकर्यांना तातडीने सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासह ईतर मागण्यांसाठी तुंगत येथील युवकाने सुरू केलेल्या आमरण उपोषणास गावचे उपसरपंच प्रकाश रणदिवे यांनी गाव परिसरातील सर्व शेतकर्यांचे वतीने पाठिंबा दिला आहे.

 

येथील गणेश मंदिर सभागृहात शेतकरी सचिन परमेश्वर रणदिवे यांनी मंगळवारपासून शेतकर्यांचे विविध मागण्यांबाबत आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पहिल्या दिवशी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि सर्व सामान्य शेतकर्यांनी यास पाठिंबा दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना सरसकट कोरडवाहू हेक्टरी एक लाख रुपये, बागायती दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत तातडीने जाहीर करण्यात यावी, राज्यातील सर्व तीन हेक्टर पर्यंत शेतकर्यांना कर्ज माफी देण्यात यावी,डाॅ. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. यासाठी सचिन रणदिवे यांनी आमरण उपोषण सुरू केले असुन यास गावचे उपसरपंच यांचेसह ग्रामपंचायत सदस्य अंगद रणदिवे, शेतकरी तानाजी पाटील, परमेश्वर पवार, सागर रणदिवे, बाजीराव भोसले यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *