आरक्षणाविषयी लेख महाराष्ट्र,

संपादकीय लेख,…. दि.26/10/2025,अखेर आर्थिक निकषांवर आरक्षण असावे हा विषय च फोल ठरला… जातीवरच आरक्षण असावे हेच सिद्ध झाले…
अॅड. संजय चंदनशिवे पुणे,

आरक्षणाचा विषय आला की काही मनुवादी सनातनी प्रवृत्ती चे लोक आर्थिक आरक्षणाचे तुणतुणे आरक्षण विरोधी फड उभा करतात आणि आरक्षण हे जातीय निकषांवर नसावे तर ते आर्थिक निकषांवर असावे असा सोयीस्कररित्या फेक नेरेटीव तयार करुन जनतेला आर्थिक निकषाचा विषय चघळायला देतात. परंतु ह्याच लोकांनी स्वातंत्र्यापुर्व काळात सत्ता कोणाचीही येवो मग मोगलांची असो, शिवकालीन असो, इंग्रज पोर्तुगीज डच कुणाचीही अशी कुणाचीही असो त्या सत्तेमध्ये ह्या मनुवादी सनातनी लोकांनी आपले उखळ पांढरे शासन प्रशासनात पांढरे करुन घेतले आहे ह्या राजसत्ता प्रशासनामध्ये त्यांनी जातीच्याच आधारावर आरक्षण घेतले आहे. शासन प्रशासनात तेच राहिले आहेत. कारण मनुस्मृती नुसार इतरांना शिक्षण घेण्याचा संपत्ती साठवण्याचा माणुसकीचा स्वाभिमानी जगण्याचा कोणताही अधिकार नव्हता म्हणून मनुस्मृती नुसार एकाच जातीला तो अधिकार होता. त्यामुळे खालच्या जाती प्रगती पासून आणि माणुसकी पासून हजारो वर्षांपासून गुलामगिरीत खितपत पडल्या त्या जातींना राजर्षी छ. शाहू महाराजांनी आरक्षण देऊन प्रगतीची आणि माणुसकीची दारे खुली केली. महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी १९५० साली भारतीय संविधानात देशातील तमाम वंचित बहुजन घटकांच्या प्रगतीची आणि माणुसकीची सोय कलम ३४०,३४१,३४२नुसार केली. त्यामुळे वंचित घटक प्रगती करु लागला. उणीपुरी आरक्षणाला दहा वर्षे पुरी होत नाहीत तोपर्यंत मनुवादी आरक्षण विरोधी गळा काढू लागला. आरक्षण विरोधी भूमिका घेऊ लागला आरक्षणाला बदनाम करु लागला. आरक्षण समर्थकांना सरकारचे जावई म्हणू लागला. आरक्षणाच्या विरोधी इतर जातींना करु लागला. आरक्षणामुळे गुणवत्ता ढासळतेय असा करु लागला. एकंदरीत भारतीय संविधानाला बदनाम करण्याचा प्रयत्न करु लागला. तरीही आंबेडकरी चळवळ ह्या आरक्षण विरोधकांशी दोन हात करीत पुढे चालली होती. सर्वांना एकसमान न्याय देण्यासाठी झगडत होती. परंतु सरकार आणि विरोधी पक्ष हे एकाच माळेचे मणी त्यांची विचारधारा च मनुस्मृती वर आधारित असल्यामुळे आरक्षणाची ऐशी की तैशी झाली. स्वातंत्र्याच्या ७०/७५वर्षात फक्त पाच टक्के आरक्षणाची अमंलबजावणी झाली. अनुसूचित जाती जमाती प्रगती करु लागला गुलामगिरी नाकारुन पुढे चालला हीच गोष्ट नेहमी मनुवादी व्यवस्थेला खटकत राहिली. मंडल आयोग लागू झाल्यानंतर तर मनुवादी व्यवस्थेच्या पोटात गोळा आला. ओबीसीला २७%आरक्षण लागू झाले नंतर मात्र आरक्षण विरोधी सक्रिय झाल्या इतके एस सी एसटी आरक्षणाला त्या सहानुभूती पूर्वक पाहात होत्या परंतु मंडल आयोग लागू झाले नंतर मात्र त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेल्याची जाणवते त्यांनी मोठ्या प्रमाणात आरक्षण विरोधी मोहीम उघडली आणि आता जातीवाद संपला आहे. भेदभाव अस्पृश्यता नष्ट झाली आहे. आरक्षण हे आर्थिक निकषांवर असावे असा फेक नेरेटीव पसरवायला सुरूवात केली आणि लोकांना खरे वाटु लागले. आरक्षण जातीवर कशाला आर्थिक निकषांवर च असावे असा लोकांचा समज झाला परंतु वस्तूस्थिती त्यांना माहीत नव्हती… त्यामुळे त्यांचा आर्थिक निकषांवर आरक्षण असावे हे नुकत्याच घडलेल्या घटनेवरून दिसून येते.
काल परवा म्हणजे दि. ६आॅक्टोबर२०२५ रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जस्टीस बी. आर. गवई यांचे वर एका सनातनी विचाराच्या विकृत मानसिकतेच्या वकिलाने भर कोर्टात बुट फेकण्याचा लाजिरवाणा,किळसवाणा निंदनीय प्रकार केला. हा न्यायिक इतिहासातील काळा दिवस मानावा लागेल. कारण जगातील सर्वात मोठे लोकशाही ला मानणारे संसदीय लोकशाही चे न्याय मंदीर म्हणूनच भारताची ओळख जगामध्ये आहे.हे सर्वश्रुत आहे..आणि भारताच्या न्याय मंदीरात सनातनी धर्मांध झालेल्या विकृत बुध्दीच्या वकिलाने बुट फेकण्याचा निंदनीय प्रकार करावा आणि त्याने तो जाणून बुजून केला… केला तो वरून तो म्हणतोय सनातन का अपमान नही सहेंगे..हा घृणास्पद क्रिमिनल अपराध तर आहेच परंतु कोर्टाची बेअदबी सुध्दा आहे. तसेच अॅट्रॉसिटी सुध्दा गुन्हा आहे… ह्या निंदनीय घटनेमुळे भारताची मान जगात शरमेने खाली गेली तर आहेच. परंतु भारताच्या पवित्र न्याय मंदिराला काळा डाग लागला आहे… परंतु ज्या सनातनी वकिलांनी बुट फेकण्याचा प्रयत्न केला त्याला महापराक्रम वाटला मनुवादी पुढे पन्नास वर्षानंतर इतिहास लिहतील त्यावेळी त्याला महापराक्रमी च म्हणतील.
तस पाहिल तर देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्याला आहे त्या जागेवर अटक करु शिक्षा सुनावू शकत होते. परंतु त्यांना त्याला माफ करुन सोडुन दिले आणि शांतपणे आपले पुढील काम सुरू ठेवले. केवढे हे औदार्य म्हणावे सरन्यायाधीशाचे….एक साधा टिनपाट भर कोर्टात आपला अपमान करतोय आणि आपण सोडून देतोय…. हे केवळ भ. बुद्धांच्या सम्यक शांतीच्या विचाराने घडले आहे.बहुतेक करून त्या टिनपाट साध्या वकीलाचा विचाराचा रोक मनातील उद्देश काय असावा हे गवई साहेबांनी ओळखले असावे.म्हणूनच त्याला मोकळे सोडले असावे…. दिल्ली बार ने त्याच्यावर कारवाई केली त्याची सनद रद्द केली. हा भाग अलहिदा….
परंतु या विकृत मानसिकतेच्या वकिलाला याबद्दल किंवा न्यायाधीशावर बुट फेकण्याचा निंदनीय प्रकार केला याबद्दल सुध्दा त्याला यत्किंचितही फरक पडला नाही पश्चात्ताप नाही…. ह्याचे मुजोर वर्तन म्हणजे तो मिडियावर म्हणतो, मला परमात्म्याने ही बुध्दी दिली म्हणून मी हे कृत्य केले. असा हा मुजोर वकील जाहीर पणे म्हणतो.म्हणजे विकृत विचारांचा कळसच म्हणावे की काय असेच वाटते….म्हणजे तुझा परमात्मा तुला विकृत मानसिकता शिकविते हेच सिद्ध झाले आणि त्या विकृत परमात्माच्याचा तु वारसदार आहे…. खरं तरं म्हणजे या देशात तुला भारतीय संविधानाने मुक्त स्वातंत्र्य दिले मुलभूत अधिकार दिले. आणि त्या स्वातंत्र्याचा गैरवापर करीत तु सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांवर बुट फेकण्याचा निंदनीय प्रयत्न करतोय. . …काय तुझी लायकी आणि तुझी कृती किती कृतघ्नपणाची आहे.आश्चर्य म्हणजे याचेही पुढे जाऊन त्याचे सनातनी प्रवृत्तीचे समर्थक म्हणतात, खरं ह्या विकृत माणसाला…क्रांतिकारक म्हटलं पाहिजे, कोण म्हणत ह्याला भारतरत्न किताब दिला पाहिजे. सोशल मीडियावर तर एका सनातनी विकृत बहादाराने चीफ जस्टीस आॅफ इंडिया च्या बी. आर. गवई साहेबांचा चेहरा पुर्ण निळा निळा असा आसुरा सारखा करुन त्यांचे डोळे उग्र करुन त्यांचे गळ्यात अक्षरश: मडके अडकविले आहे. असे संतापजनक व्हिडिओ, चित्र सोशल मीडियावर फिरविले जात आहे.किती ना लायक पणा हा नथुराम च्या औलादींचा….म्हणजेच विकृत वकिलाच्या विकृत कृती मुळे सनातनी धर्माची मानसिकता काय आहे हे आता सुर्यप्रकाशा इतके उघड झाले आहे. असे व्हिडिओ, चित्र काढणारा ला खरं तर धन्यवाद दिले पाहिजेत.कारण अशा विकृत प्रवृत्ती च्या माणसांचे विकृत विचार पोटातील ओठांवर आले…. म्हणजे ह्या विकृत मानसिकतेच्या लोकांनी एक प्रकारे क्रांती प्रतिक्रांतीलाच सुरूवात केली आहे.आंबेडकरवादी कायमच म्हणत असतो आमचेही नांव कलबुर्गी, गौरी लंकेश,दाभोळकर, काॅम्रेड गोंविद पानसरे यांचेसारखे तुमच्या गोळी वर लिहा….हा उदात्त विचार त्याच्याकडे आहे. आणि त्याच्याकडे गमवण्या सारखे काही नाही. तो म्हणतो आजही मरणार आहे आणि उद्या तर मरणारच आहे तर किड्यांमुंग्या सारखे मरण्यापेक्षा शहिद होवून मरू …तो असाच विचार करतो…आणि आजपर्यंत असे किती जन्माला आले आणि किती मेले याचे गणित नाही त्यामुळे तो कायमच मनुवादी व्यवस्थेला विरोध करीत आला आहे.म्हणूनच मनुवादी व्यवस्थेचे पहिले टारगेट आंबेडकर वादीच आहे.म्हणूनच त्यांनी सर्वोच्च स्थानावर हल्ला करून देशातील दलित शोषित वंचित ओबीसी अल्पसंख्याक समाजावर दहशत दबाव ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे..परंतु तुमच्या मनात काय चालले आहे हे सर्व जग मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.हे विकृत विचारांच्या लोकांनी विसरले नाही पाहिजे..
चीफ जस्टीस आॅफ इंडिया हे पद देशातील सर्वोच्च संवैधानिक पद आहे. त्या पदाची गरिमा जगप्रसिद्ध आहे… देशाच्या राष्ट्रप्रमुखाला म्हणजे राष्ट्रपती ला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे गोपनीयतेची संवैधानिक शपथ देतात. तसेच सर्वोच्च न्यायालयात पिडीतांना न्याय देतात. एवढेच काय राममंदिर बाबरी मस्जिद चा कित्येक दशके लोंबाळलेला वाद भारतीय संविधानानुसार सर्वोच्च न्यायालयाचे घटना पीठाने सोडविला आहे.त्यावेळी मात्र ह्यांच्या देवाचा वाद सोडविण्यासाठी संविधान चालते…असे असताना विकृत बुध्दीची ना लायक माणस सर्व समाजाला वेठीस धरुन अशी अवैध अशोभणीय कृत्ये करतात. आणि ते अशी कृत्ये करुन त्यांच्या संपूर्ण समाजाला बदनाम करतात.त्या समाजाने अशा विकृत प्रवृत्ती ला ठेचनूच काढले पाहिजे…. जर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांना जातीचे आधारावर भक्ष्य केले जात असेल टारगेट केले जात सामान्य बहुजन जातींतील लोकांची काय अवस्था असेल… त्यांची मानसिकता काय झाली असेल…आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जस्टीस बी आर गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे केवळ जातीच्या आरक्षणातून जस्टीस झालेले नाहीत तर ते अस्सल सोन्यासारखे गुणवत्तेवर झाले आहेत.तिथपर्यंत खालच्या पायरी पासून वरच्या पायरी पर्यंत पोहचलेले आहेत….हे इथे लक्षात घेतले पाहिजे.असे असताना राकेश किशोर नामक सनातनी विचारांचा एक साधा वकील हा म्हणतो, हम सनातनी धर्म का अपमान नही सहेंगे… मी त्याला साधा वकील का म्हणतोय त्याच्या सारखे देशात लाखो करोडो वकील आहेत. पण ह्या वकिलाला आपण उच्च वर्णीय जातीचे आहोत श्रेष्ठ आहोत हा जातीचा अहंपणा आहेआणि आपल्या समोर सर्वोच्च स्थानी बसलेला सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य सरन्यायाधीश असला तरी तो माझ्या उच्च वर्णीय जाती पुढे शुद्रच आहे खालच्या जातीचा शुद्रच आहे….ही मनुवादी विचारांची त्याची मानसिकता आहे. त्याला त्याच्या उच्च वर्णीय जातीचे आहोत ह्याचा त्याला भलताच अहंकार आणि गर्व आहे. हा उच्च वर्णीय जातीचा अहंकार आणि गर्व रोजच बहुजन समाजातील जातींना आणि अल्पसंख्याक समाजातील लोकांना टारगेट करतो. रोज देशात द्वेषाचे वातावरण पसरवितो.विशेषत: उत्तर भारतात बहुजन समाजातील छोट्या छोट्या जातीचा छळ करतो . अल्पसंख्याक समाजातील लोकांचा छळ करतो.हे सोशल मीडियावर रोजच आहे…ह्यांच्या विकृत विचारांमुळे देशात अंतर्गत यादवी होईल की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. ..आणि असेच दुषित गढूळ वातावरण राहिले तर देशाचे अनेक तुकडे तर होतीलच पण अल्पसंख्याक समाजाचे काय होणार…? मग कोण कोण कोणत्या जाती अल्पसंख्याक आहेत हा त्यांनी तपासून पाहून स्वतः ला प्रश्न विचारला तर बरे होईल….
इथे महार किंवा बौद्ध समाजाचा किंवा आंबेडकरी विचारधारेच्या लोकांचा प्रश्न नाही. महार किंवा बौद्ध जात देशात बहुसंख्याकंच आहे त्यामुळे त्यांची काळजी कुणी करु नये… तर प्रश्न आहे देशातील सुमारे साडे सहा हजार बहुजन वंचित दुर्बल जातींचा… कारण ह्या जाती मनुस्मृती नुसार शुद्र वर्णातील आहे. पण त्या स्वतः ला स्व समाधानासाठी उच्च वर्णीय उगच्याउगीच मानतात… आणि ह्या जाती सनातनी धर्मातील धर्मांध झालेल्या लोकांना सनातनी हिंदू धर्म आणावयाचा आहे. त्यांचेवर लादायचा आहे..म्हणजेच साडे सहा हजार जातींना गुलाम बनवायचे आहे .. ज्या जातींना आता कुठे स्वातंत्र्याच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात स्वातंत्र्य मिळाले आहे त्या जाती आज शिकू लागल्या नोकरी स्वतः चा उद्योग धंदा घरे बंगले बांधू लागल्या आहेत. म्हणजे त्यांना रोटी कपडा और मकानचे अधिकार मिळाले…आता त्याच जातींना टप्याटप्याने गुलाम करावयाचे आहे हे मनुवादी विचारांचे टारगेट त्यांचे वेगवेगळ्या कृतीवरून दिसते आहे. म्हणूनच ते सतत आरक्षण विरोधी गरळ ओकत असतात. आरक्षण विषयच त्यांना मान्य नाही. ते म्हणतात आरक्षणामुळे गुणवत्ता ढासळते… आरक्षणामुळे ना लायक माणसे शासनात प्रशासनात येतात. . अशा काय त्यांच्या निबृध्द व्याख्या आहेत. त्यामुळे आर्थिक निकषांवर आरक्षण असले पाहिजे.असा त्यांचा आग्रह अट्टाहास हा कायमच आहे…मग ते बहुजन समाजातील कुणा लुंग्या सुंग्या अभ्यास नसलेल्या अअभ्यासक निबृध्द विचारवंताना मिडिया समोर बोलवून त्याचा यथोचित सत्कार मानसन्मान करुन त्याच्या तोंडुन आर्थिक निकषांवर आरक्षण असले पाहिजे..असच वदवून घेऊन तो नेरेटीव सेट करुन लोकात पसरविला जातो….आणि लोकांनाही बरे वाटते…गुदगुल्या होतात. त्यांना वाटते हे मांडतात तेच बरोबर आहे.बाकी सब झुठ आहे…खरं …तर गरजू गरीब लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे अशी लोकांमध्ये खमंग चर्चा रंगविली जाते.. मग कोण म्हणते आरक्षण कुणालाच नको.. कोण म्हणते समान नागरी कायदाच लागू करा.. कोण म्हणते आर्थिक निकषांवर आरक्षण असले पाहिजे…अशा अनेक चुकीच्या गोष्टी वर चर्चा करायला लोकांना भाग पाडले जाते नव्हे तर त्यांचेवर मिडिया च्या माध्यमातून ठळक बातम्या तुन लादलेच जाते..त्यांना मुळ दुखणे मुळ वस्तूस्थिती कळूच दिले जात नाही… असे प्रकार संविधान लागू झाले पासुन म्हणजे सन १९५० सालापासुन असेच घडत आले आहे. आणि ते पुढे घडते आहे..
मुळात आरक्षण म्हणजे गरीब हटाव कार्यक्रम नाही. कोण गरीब राहिले म्हणून त्याला आरक्षण द्या असे नाही. भारतीय संविधानात Drictive Pricipal Of State Policyमध्ये लोककल्याणकारी राज्याची संकल्पना घटनाकारांनी मांडली आहे जे वंचित शोषित घटक आहे त्यांना गरीब रेषेच्या वर आणण्यासाठी सरकारने हजारो योजना निर्माण करुन गरीब दुर्बल घटकातील लोकांना गरीब रेषेच्या वर आणणे ही सरकारचीच जबाबदारी आहे आणि त्या योजना राज्य सरकार व भारत सरकार दरवर्षी आखते आणि त्या योजना कार्यरत आहेत. मुळात आरक्षण म्हणजे शासन प्रशासनातील प्रतिनिधित्व.. तो गरीब हटाव कार्यक्रम नाही. कोण कुणाला गरीब श्रीमंतीच्या आधारावर भेदभाव करीत नाही.किंवा शासन प्रशासनातील प्रतिनिधित्व नाकारत नाही.तर प्रतिनिधित्व हे जातीच्या आधारावरच नाकारले जाते. उदाहरणार्थ एखादा मागासवर्गीय जातीचा माणूस गडगंज पैसे वाला आहे म्हणून त्याला कोणी ओपन जागेतून लायक असताना सुध्दा साधा सरपंच केले जात नाही. त्याला त्याची जात दाखविली जाते. प्रशासनातील सेवेत सुध्दा तसेच आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करताना त्याची जातच बघितली जाते. गरीब श्रीमंती नाही… जाती वरूनच भेदभाव होतो.
जस्टीस बी. आर गवई अनुसूचित जातीचे समाजाचा रोष ओढवित एस सी. मध्ये उपवर्गीय आरक्षणाचा निर्णय दिला तसेच त्या जातीतील सधन व्यक्तींना क्रिमिलेअर लागू करा व समाजातील एका पिढीने आरक्षण घेऊन प्रगती केली असेल तर पुढच्या पिढीला आरक्षण नको असा न्याय निर्णय दिला. त्या वेळी देशात गदारोळ माजला. मोर्चे आंदोलन, बंद पाळले गेले…. गवई साहेबांनी समाजाचा रोष ओढवून घेतला आणि त्यानंतर ते मुख्य न्यायाधीश झाले. आता मात्र त्यांनाच सनातन्यांनी त्यांची जात दाखविली. तुम्ही किती जरी मोठ्या पदावर बसला असला तरी तुम्ही शुद्रच आहात. आमच्या पेक्षा श्रेष्ठ नाही आम्ही च तिन्ही लोकी श्रेष्ठ आहोत. हेच दाखवून दिले…असे म्हणूनच आता सनातन्यांनी जस्टीस बी. आर गवई साहेबांची जात दाखवून दिली…. राकेश किशोर विकृत बुध्दीच्या ना लायक वकीलाचे खरं आभार च मानले पाहिजेत …कारण त्याच्या विकृत कृतीतून सिध्द झाले आहे की तुम्ही किती जरी मोठ्या पदावर बसला असला तरी तुम्ही शुद्रच आहात. तुम्ही किती जरी धनसंपत्ती ने पैशाने गबरगंड असला तरी तुम्ही शुद्रच आहात. तुमची जात कधीच पुसली जाणार नाही. . आमचे स्टॅण्डर्ड देव मानले अगदी लोटांगण घातले तरी तुम्ही शुद्रच आहात. तुम्ही खालचेच ते खालचेच आहात. हे सिद्ध केले.
त्यामुळे आता आरक्षण प्रतिनिधित्व जातीवर पाहिजे की आर्थिक निकषांवर…. हे तुम्ही च मनाला विचारा.
पण गवई साहेबांवर झालेल्या बुट फेकीच्या प्रयत्नामुळे किंवा जातीय मानसिकतेच्या भेदभावामुळे आरक्षण हे जाती वरच असले पाहिजे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *