अंमली पदार्थ उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर धाड,

संपादक ,राम गायकवाड :- परिमंडळ ६ मर्धाल पथकाने अंमली पदार्थ उत्पादन व विक्री करणाऱ्या टोळीवर लक्ष केंद्रीत करून पेल्हार, नालासोपारा, जिल्हा पालघर परिसरातील मेफेड्रोन (एम.डी) निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर यशस्वी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १३,४४,५३,७०० रुपये किंमतीचा अंमली पदार्थ व कच्चा माल जप्त केला असून एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

दिनांक ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी मर्धाल पथकाला एका इसमाकडून अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर टिळक नगर परिसरात सापळा रचण्यात आला. कारवाईत ५७.८४ ग्रॅम मेफेड्रोनसह हा इसम ताब्यात घेण्यात आला. त्याच्याविरुद्ध टिळक नगर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

 

अंमली पदार्थ विक्रीच्या साखळीचा माग काढत तपास पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत आणखी ४ आरोपींना मुंबई आणि मिरा रोड येथून ताब्यात घेतले. चौकशीत या टोळीने रशीद कंपाऊंड, खैरपाडा, भावखळ, पेल्हार, नालासोपारा येथे मेफेड्रोन उत्पादनासाठी बेकायदेशीर फॅक्टरी चालवत असल्याचे उघड झाले.

 

त्यानुसार पोलिसांनी फॅक्टरीवर छापा टाकत ०६ किलो ६७५ ग्रॅम एम.डी, उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल आणि यंत्रसामग्री असा एकूण १३.३८,५३,७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अंमली पदार्थ वितरण आणि उत्पादन साखळीला मोठा धक्का बसला आहे.

 

हि संपूर्ण कारवाई

मा. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई श्री. देवेन भारती,

मा. पोलीस सहआयुक्त (गुन्हे) श्री. सत्यनारायण चौधरी,

मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व विभाग डॉ. महेश पाटील,

मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ६ श्री. समीर शेख,

सहायक पोलीस आयुक्त देवनार विभाग श्री. आबुगव सोनावणे

यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

 

कारवाईसाठी

प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनिषा कुलकर्णी,

सपोनि. मैत्रानंद खंदारे, विलास पवार,

पोउनि. विजयसिंह देशमुख, सुशांत साळवी, अजय गोल्हार,

पोह. राणे, आखाडे, भिलारे, सावंत, उपाध्यय, दिवटे,

पोशि. पुंजारी, केदार, भिसे, झिणे, राउत, सानप,

नागरगोजे, काटकर, काशिद

यांचे विशेष योगदान राहिले.

 

अंमली पदार्थ जाळ्याच्या मूळ सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास अधिक वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *