शेतकऱ्यांचे प्रश्न ,मार्गी लावा नाहीतर उग्र स्वरूपाचे आंदोलन करू, स्वाभिमानी शेतकरी संघटना,

 

 

सोलापूर ,प्रतिनिधी: दादासाहेब जगताप ,संविधान न्यूज चॅनल सहसंपादक .महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी उपोषणाला आता निर्णायक वळण मिळत आहे. शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार मा. राजू शेट्टी साहेब दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी सांगोला येथे आगमन करून मा. प्रफुल्ल कदम यांच्या उपोषणाला वैचारिक व संघटनात्मक पाठिंबा देणार आहेत.

 

 

शेतकऱ्यांना हमीभाव, ऊस दर, पीकविमा, वीजदर कपात, तसेच शेती उत्पादन खर्चात वाढ अशा विविध प्रश्नांवर सरकारकडून ठोस धोरणे जाहीर करण्याची मागणी प्रफुल्ल कदम यांनी केली आहे. या मागण्यांसाठी ते सांगोला येथे आमरण उपोषण करत आहेत.

 

राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला अधिक बळ मिळणार असल्याचे स्थानिक शेतकरी व संघटनात्मक पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सांगोला तालुक्यासह परिसरातील शेतकरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने तातडीने प्रतिसाद द्यावा, अन्यथा आंदोलन उग्र स्वरूप धारण करू शकते, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्पष्ट केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *