प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली.

 

 

*गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा : पंढरपूर तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान; खासदार प्रणिती शिंदे यांची पाहणी, तातडीच्या मदतीची मागणी*

 

पंढरपूर, दि. ०८ एप्रिल २०२६

मुख्य संपादक राम गायकवाड

पंढरपूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या अचानक बदललेल्या हवामानामुळे काढणीस आलेली पिके व फळबागा मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाल्या असून शेतकऱ्यांच्या “हातातोंडाशी आलेला घास हिरावला” गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

 

तालुक्यातील द्राक्ष, केळी, कांदा, पेरू यांसह विविध फळबागा, भाजीपाला आणि काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके पूर्णतः नुकसानग्रस्त झाली आहेत.

 

आज सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यातील तनाळी या गावांला भेट देत प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. तसेच शासनाने तातडीच्या उपाययोजना करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पाहणी दौऱ्यावेळी पंढरपूर तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप पाटील, तालुका उपाध्यक्ष सादिक मुलाणी, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार,सरपंच सुधाकर मोटे.म्हाळप्पा मासाळ, ज्ञानेश्वर होनमाने, लक्ष्मण श्रीराम, भीमराव पाटील, सुभाष लवटे, विलास रोंगे, पांडुरंग रोंगे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

संविधान न्यूज चैनल व पोर्टल

#सोलापूरजिल्हा

#खासदारप्रणितीशिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *